सानिया, कारा उपांत्य फेरीत

By Admin | Updated: August 10, 2014 02:09 IST2014-08-10T02:09:10+5:302014-08-10T02:09:10+5:30

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह खेळताना डब्ल्यूटीए रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला़

Sania and Kara in semis | सानिया, कारा उपांत्य फेरीत

सानिया, कारा उपांत्य फेरीत

>माँट्रियल : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह खेळताना डब्ल्यूटीए रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला़ 
स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि ब्लॅक यांनी जबरदस्त खेळ करताना अमेरिकेच्या रॉक्वेल कोप्स जोन्स आणि अबिगॅल स्पीअर्स या जोडीवर 6-2, 6-1 असा विजय मिळविला़ 
या लढतीत सानिया आणि कारा यांना ब्रेक पॉइंटच्या दहा संधी मिळाल्या़ त्यापैकी सहामध्ये त्यांनी यश मिळविल़े विजयी जोडीला आता उपांत्य फेरीच्या लढतीत चिनी तैपेईच्या सू वेई सीह आणि चीनची शुहाई पेंग या द्वितीय मानांकित जोडीशी झुंज द्यावी लागणार आह़े (वृत्तसंस्था)

Web Title: Sania and Kara in semis