सानिया-हिंगीस तिसऱ्या फेरीत

By Admin | Updated: August 20, 2015 23:29 IST2015-08-20T23:29:39+5:302015-08-20T23:29:39+5:30

भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीची ज्युलिया जॉर्ज्स आणि पोलंडची

Sania and Hingis in third round | सानिया-हिंगीस तिसऱ्या फेरीत

सानिया-हिंगीस तिसऱ्या फेरीत

सिनसिनाटी : भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीची ज्युलिया जॉर्ज्स आणि पोलंडची क्वोडिया जेन्स इग्नेक यांना यूएस ओपन सिरीजच्या वेस्टर्न अँड सदर्न ओपन चॅलेंजरच्या दुसऱ्या फेरीत महिला दुहेरीत पराभूत करून तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
३८ लाख २६ हजार ६५५ डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत भारतीय-स्वीस जोडीने ही लढत ७-६, ६-४ अशी जिंकली. पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर सानिया-हिंगीस जोडीने दुसरा सेट ६-४ असा जिंकून तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.
एक तास २१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत सानिया आणि मार्टिना यांनी १२ पैकी ६ ब्रेक पॉइंटचे गुणांमध्ये रूपांतर केले, तर ज्युलिया-इग्नेक जोडी आठपैकी पाच ब्रेक पाँइंट घेण्यात यशस्वी ठरली.

Web Title: Sania and Hingis in third round