शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

ब्रीजभूषण यांच्याविरूद्ध आखाड्याबाहेरील कुस्ती अन् आता विदेशात डंका; पदक जिंकताच संगीता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 12:21 IST

Sangeeta Phogat Wins Bronze Medal : कुस्तीपटू संगीता फोगाटने देशासाठी कांस्य पदक जिंकले आहे.

Sangeeta Phogat Wins Bronze : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या संगीता फोगाटने विदेशात मोठ्या स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारताची महिला कुस्तीपटू संगीता फोगाट हिने हंगेरीत बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड रँकिंग सिरीज स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. तिने तिसऱ्या-चौथ्या स्थानाच्या लढतीत हंगेरीच्या व्हिक्टोरिया बोर्सोसचा ५९ किलो वजनी गटात पराभव करून कांस्यपदक पटकावले. खरं तर संगीता फोगाटचा त्या पैलवानामध्ये समावेश होता ज्यांनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले होते.

सुरूवातीला भारतीय कुस्तीपटूचा पराभव झाला पण दुसऱ्या सामन्यात तिने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला. परंतु हंगेरीची कुस्तीपटू व्हिक्टोरिया बोरसोसविरुद्ध कांस्य पदकासाठीच्या लढतीत संगीताने बाजी मारली. लक्षणीय बाब म्हणजे मागील वर्षी संगीताने ६२ किलो वजनी गटात नॅशनल चॅम्पियनशिमध्ये विजय मिळवला होता.

आखाड्याबाहेरील कुस्ती अन् आता विदेशात डंकाऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाची पत्नी आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती गीता फोगाटची बहीण संगीता हिने अमेरिकेच्या जेनिफर पेज रॉजर्सकडून धक्कादायक पराभव करून आपल्या अभियानाची सुरुवात केली होती. पण रेपेचेज फेरीद्वारे तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. संगीताने तिसऱ्या फेरीतील विजयासह उपांत्य फेरीत स्थान मिळवले, मात्र तिला अंतिम फेरीत जागा मिळवता आली नाही.

पदक जिंकताच संगीता भावुक पदक जिंकल्यानंतर संगीता फोगाटने एक भावनिक ट्विट केले. "तुम्ही सर्वांनी केलेल्या अभिनंदनाचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, मी या क्षणी खूप भावुक झाली आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हे पदक फक्त माझे नाही तर तुम्हा सर्वांची ही पदके आहेत. मी हे पदक महिलांवरील गुन्ह्यांविरुद्ध लढणाऱ्या जगातील सर्व लढणाऱ्या महिलांना समर्पित करत आहे", असे संगीताने फोगाटने म्हटले.  

टॅग्स :Wrestlingकुस्तीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहVinesh Phogatविनेश फोगट