संगकाराला विजयी निरोप देणार : मॅथ्यूज
By Admin | Updated: August 6, 2015 22:56 IST2015-08-06T22:56:50+5:302015-08-06T22:56:50+5:30
पुढील आठवड्यात १२ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका कसोटी मालिकेमध्ये लंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संघकारा

संगकाराला विजयी निरोप देणार : मॅथ्यूज
कोलंबो : पुढील आठवड्यात १२ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका कसोटी मालिकेमध्ये
लंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संघकारा याच्यावर साऱ्या क्रिकेटजगताचे लक्ष असेल. आपल्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळणाऱ्या संघकाराला शानदार विजयासह निरोप देण्याचा निर्धार लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने केला आहे.
संघकारा महान खेळाडू आहे. त्याच्यासारख्या दिग्गज आणि सर्वश्रेष्ठ खेळाडूला मालिका विजयाद्वारे निरोप देणे सर्वांत उचित ठरेल, असे मॅथ्यूजने सांगितले.
संघकाराने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले असून, भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील २० ते २४ आॅगस्टदरम्यान पी. सारा ओव्हल स्टेडियमव खेळविण्यात येणाऱ्या दुसऱ्या सामन्यानंतर संघकारा क्रिकेटमधून निवृत्त होईल.