तेंडुलकरकडून संगकारा, जयवर्धनेचे कौतुक
By Admin | Updated: March 18, 2015 23:31 IST2015-03-18T23:31:47+5:302015-03-18T23:31:47+5:30
क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह दिग्गज खेळाडूंनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या़

तेंडुलकरकडून संगकारा, जयवर्धनेचे कौतुक
सिडनी : वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत संघाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर वन-डे क्रिकेटला अलविदा करणारे श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह दिग्गज खेळाडूंनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या़
तेंडुलकरने टिष्ट्वट केले, की इतकी वर्षे श्रीलंकेच्या वन-डे टीमचा हिस्सा राहिल्यानंतर तुमच्याविना या संघाची कल्पना करणे कठीण आहे़ आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा़
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ म्हणाला, की संगकारा आणि जयवर्धने यांनी श्रीलंकेसाठी दिलेले योगदान शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही़ या अनुभवी खेळाडूंची लंका संघाला उणीव जाणवेल, यात शंका नाही़ आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन म्हणाला, की माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या दोन महान खेळाडूंना वन-डे संघातून बाहेर जाताना बघणे दु:खद क्षण आहे़ त्यांनी संघासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे़(वृत्तसंस्था)