वाळूज ३
By Admin | Updated: September 2, 2014 19:35 IST2014-09-02T19:35:31+5:302014-09-02T19:35:31+5:30
राजा शिवाजी विद्यालयाचे यश

वाळूज ३
र जा शिवाजी विद्यालयाचे यश वाळूज महानगर : औरंगाबाद जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात बजाजनगरातील राजा शिवाजी विद्यालयाने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. रामदास कोरडे पाटील विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील ३५ संघांनी सहभाग घेतला होता. राजा शिवाजी विद्यालयाने अंतिम सामन्यात लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूल विद्यालयाचा ८ गुणांनी पराभव करून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक ए.एम. पाटील, सी.के. जाधव, डी.टी. जारवाल, एन.बी. साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका व्ही.के. जाधव, ई.डी. पठाण, बी.जी. गायकवाड, व्ही.के. कोर्हाळे, आर.आर. सोमासे यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्व खेळाडूंचे स्वागत केले आहे. फोटो ओळ - राजा शिवाजी विद्यालयाच्या विजयी कबड्डी संघासोबत शिक्षकवृंद फोटो क्रमांक - ०२ सप्टेंबर, संघ-----