सॅम्युअल्सचा भारत दौरा पूर्ण करावयाचा होता
By Admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:54+5:302014-10-25T22:42:54+5:30
किंग्स्टन :

सॅम्युअल्सचा भारत दौरा पूर्ण करावयाचा होता
क ंग्स्टन : वेस्टइंडीजचा फलंदाज मलरेन सॅम्युअल्स भारत दौरा अर्धवट सोडण्याच्या योजनेचा वाटेकरी नव्हता आणि तो या दौर्यादरम्यान अधिकृत संघाच्या बैठकीत उपस्थितदेखील नव्हता़ प्रसारण माध्यमाच्या वृत्तांमध्ये ही माहिती देण्यात आली़ जमैकाचा हा खेळाडू दौरा पूर्ण करण्याकडे ध्यान देत होता आणि त्यानंतर करार व वेतन या प्रकरणांवर विचार करीत होता़ या वादग्रस्त निर्णयासंदर्भात सॅम्युअल्सने पहिल्यांदाच वाचा फोडली़ तो म्हणाला, प्रथम प्राधान्य वेस्टइंडीज क्रिकेट आहे आणि यासाठी मी संपूर्ण दौर्यादरम्यान खेळावर लक्ष्य केंद्रित केल़े