कोहलीच्या फॉर्मची सॅमीला भीती
By Admin | Updated: October 3, 2014 01:20 IST2014-10-03T01:20:35+5:302014-10-03T01:20:35+5:30
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याच्याशी सवांद साधताना नेहमी आनंद मिळतो. स्थिती काही असो त्याच्या चेह:यावरील स्मित कमी होत नाही.

कोहलीच्या फॉर्मची सॅमीला भीती
>विनय नायडू = मुंबई
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याच्याशी सवांद साधताना नेहमी आनंद मिळतो. स्थिती काही असो त्याच्या चेह:यावरील स्मित कमी होत नाही. गुरुवारी मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियात (सीसीआय) त्याची पुन्हा भेट झाली. शुक्रवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध कसून सराव केल्यानंतर त्याच्या चेह:यावर तसूभरही मरगळ दिसत नव्हती. माझे आयुष्य आणि क्रिकेट एंजॉय करत आहे. कसोटी संघ पुढे जात आहे आणि त्यात माझी गरजही तितकीशी राहिलेली नाही. तरीही एक दिवसीय आणि टी-2क् संघात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा आनंद लुटत असल्याचे, तो म्हणाला.
भारताचा स्टार विराट कोहली सध्या खराब फॉर्मात आहे. त्याच्या मागील काही सामन्यांचा अभ्यास करून तुम्ही काही रणनिती आखली आहे का?, असा प्रश्न विचारल्यास तो मिश्कीलपणो म्हणाला, मी आशा करतो की विराटला आमच्या विरुद्ध फॉर्म सापडायला नको. विराट हा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि तो कसून सराव करत असल्याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मी आशा करतो की आमच्याविरुद्ध त्याची बॅट तळपायला नको. सुनील नरिन हा चॅम्पियन आणि खतरनाक गोलंदाज आहे. तो आमच्यासाठी हुकमी एक्का आहे. तो कमबॅक करेल याची खात्री असल्याचे सॅमी म्हणाला. आमच्याकडे केमार रोच आणि जेरम टेलर यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज असल्याने सुनीलला ते चांगली मदत करतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला. त्यामुळे गतवर्षी आमच्या हातातून मालिका निसटली होती. आशा करतो की यंदा आम्ही भारताला त्यांच्याच धर्तीवर 27 वर्षानंतर हरवण्यास यशस्वी होऊ.
ही मालिका अटीतटीची होणार - पोलार्ड
मुंबई : जगातील अव्वल वन डे संघ असलेल्या भारताविरुद्ध विजय मिळवणो सोपे नसले तरी आमचा संघ यजमानांना कडवी टक्कर देण्यास सज्ज असल्याचा दावा वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज किरोन पोलार्ड याने गुरुवारी मुंबईत केला. विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस रंगणार असल्याने ही मालिका अटीतटीची होईल, यात शंका नाही असा विश्वासही त्याने व्यक्त केला. इंडियन प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग आणि इतर स्पर्धाच्या माध्यमातून आमच्या बहुतांश खेळांडूंना येथील खेळपट्टींचा अंदाज असल्याने भारतासाठी ही मालिका सोपी जाणार नाही.