समीर वर्माचे सलग दुसरे विजेतेपद
By Admin | Updated: November 8, 2015 23:37 IST2015-11-08T23:37:14+5:302015-11-08T23:37:14+5:30
भारताचा युवा बॅडमिंटनपटू समीर वर्माने बहरीन आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत सिंगापूरच्या झी लियान डेरेक वांगचा सरळ दोन सेटमध्ये पराभव

समीर वर्माचे सलग दुसरे विजेतेपद
बहरीन : भारताचा युवा बॅडमिंटनपटू समीर वर्माने बहरीन आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत सिंगापूरच्या झी लियान डेरेक वांगचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. समीरचे बहरीनमधील सलग दुसरे विजेतेपद
आहे. या स्पर्धेत ११वे मानांकन असलेल्या
समीरने वांगला २१-१४, २१-१० असे पराभूत केले. समीरने उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित व जागतिक क्रमवारीत व ४२व्या क्रमांकावर असलेल्या टीआन मीन नगुएनला पराभूत केले होते. उपांत्य फेरीत समीरने आपल्याच देशाच्या राहुल यादवला २१-१३, २१-१७ असे नमविले होते. (वृत्तसंस्था)