सॅम ग्रॉथने फेडररला झुंजवले
By Admin | Updated: July 5, 2015 01:15 IST2015-07-05T01:15:01+5:302015-07-05T01:15:01+5:30
स्वित्झर्लंडच्या दुसऱ्या मानांकीत रॉजर फेडररला आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रॉथ याने विजयासाठी चांगलेच झुंजवले. अखेर अनुभवी फेडररने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत बाजी मारुन विजयी

सॅम ग्रॉथने फेडररला झुंजवले
लंडन : स्वित्झर्लंडच्या दुसऱ्या मानांकीत रॉजर फेडररला आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रॉथ याने विजयासाठी चांगलेच झुंजवले. अखेर अनुभवी फेडररने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत बाजी मारुन विजयी आगेकूच कायम राखली.
फेडररने ग्रॉथचा ६-४, ६-४, ६ (५)-७ (७), ६-२ असा पाडाव केला. पहिले दोन सेटमध्ये सहज बाजी मारलेल्या फेडररला यानंतर ग्रॉथने कडवी लढत दिली. मात्र अनुभवी फेडररने अंतिम क्षणी ग्रॉथला पुनरागमनाची संधी दिली नाही. फ्रेंच ओपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने आपली शानदार कामगिरी कायम ठेवताना सरळ सेट्समध्ये विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
स्वित्झर्लंडच्या चौथ्या मानांकित वावरिंकाने स्पेनच्या फर्नांडो वर्डास्को याचा एक तास ५३ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला. त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. वावरिंकाने अतिशय नियोजनबद्ध खेळ केला. वर्डास्कोला चार वेळेस ब्रेक पॉइंटची संधी मिळाली; परंतु स्विस खेळाडूने प्रत्येक वेळी आपली सर्व्हिस वाचवली. वावरिंकाने १६ पैकी ३ ब्रेकपाँइंट वाचवले. (वृत्तसंस्था)
डस्टीन ब्राऊन पराभूत
स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून धक्कादायक निकाल नोंदवणाऱ्या जर्मनीच्या डस्टीन ब्राऊनला सर्बियाच्या व्हिक्टॉर ट्रॉकी याने ६-४, ७(७)-६(३), ४-६, ६-३ अशी मात दिली. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या ज्यो विल्फ्रेड त्सोंगा याने क्रोशियाच्या इव्हो कार्लोव्हिक याच्यावर ६(३)-७(७), ६-४, ६(२)-७(७), ६(९)-७(११) असा संघर्षपूर्ण विजय मिळवत आगेकूच केली.