रिओ ऑलिम्पकसाठी सलमान भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर'

By Admin | Updated: April 23, 2016 22:02 IST2016-04-23T21:58:37+5:302016-04-23T22:02:15+5:30

रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली आहे

Salman's goodwill ambassador for Rio Olympics | रिओ ऑलिम्पकसाठी सलमान भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर'

रिओ ऑलिम्पकसाठी सलमान भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर'

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २३ - रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली आहे. एखाद्या अभिनेत्याची भारतीय संघाचा 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुष्टीयोद्धा मेरी कोम, तिरंदाज दीपिका कुमारी, नेमबाज अपूर्वी चंडेला, तसंच हॉकीपटू रितू राणी आणि सरदार सिंगही उपस्थित होते. महत्वाचं म्हणजे सलमान खानदेखील त्याचा आगामी चित्रपट सुलतानमध्ये कुस्तीपटूच्या भुमिकेत दिसणार आहे. 
 
सलमान खानची निवड झाल्याबद्दल मुष्टीयोद्धा मेरी कोमने आनंद व्यक्त केला आहे. सलमान खाननेदेखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करेन असं म्हटलं आहे. त्यांनी त्यांचा उत्कृष्ट खेळ खेळावा, आणि देशासाठी उत्तम साध्य करावं. काही ना काहीतरी घेऊन या हा संदेशही सलमानने खेळाडूंना यावेळी दिला आहे. तसंच खेळांमध्ये सानिया मिर्झा, विजेंदर सिंग आणि सुशील कुमार माझे हिरो असल्याचंही सलमान बोलला आहे.
 

Web Title: Salman's goodwill ambassador for Rio Olympics