साळगावकर ‘डय़ुरंड’चा चॅम्पियन!

By Admin | Updated: November 9, 2014 02:15 IST2014-11-09T02:15:11+5:302014-11-09T02:15:11+5:30

गोव्याच्या साळगावकर स्पोर्ट्स क्लबने पुणो एफसीवर मात करीत आशियातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या 127व्या डय़ुरंड चषकाचा मान पटकावला.

Salgaocar is champion of 'Durand'! | साळगावकर ‘डय़ुरंड’चा चॅम्पियन!

साळगावकर ‘डय़ुरंड’चा चॅम्पियन!

मडगाव : थांगजाम सरण सिंगने नोंदवलेल्या गोलच्या बळावर गोव्याच्या साळगावकर स्पोर्ट्स क्लबने पुणो एफसीवर मात करीत आशियातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या 127व्या डय़ुरंड चषकाचा मान पटकावला.
साळगावकरने ही स्पर्धा तिस:यांदा जिंकली आहे. याआधी 1999 आणि 2क्क्3मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले होते. विजेत्या संघास 25 लाख व उपविजेत्या संघास 15 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
अंतिम सामना पाहण्यासाठी राय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर फुटबॉलप्रेमींची गर्दी उसळली होती. सामन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे अवघ्या 15 मिनिटांच्या आतच साळगावकरने चेंडू आपल्या ताब्यात मिळवला. 18व्या मिनिटाला साळगावकरच्या डॅरल डफीने रोकस लामराकडे पास दिला. मात्र, त्याचा फटका पुणो फुटबॉल क्लबच्या गोलजाळीजवळून गेला. ही संधी हुकल्यानंतर साळगावकरने 21व्या मिनिटाला यश मिळवले. रोकस लामराकडून मिळालेल्या पासवर थांगजाम सरन सिंगने पुणोचा गोलरक्षक अरमिंदरला चकवून पहिला गोल नोंदवला. त्यानंतर 32व्या मिनिटाला पुणोच्या फानाली लालरमपूईयाने मारलेला फटका साळगावकर संघाच्या गोलरक्षकाने अडविला व पुणो संघाकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. 41व्या मिनिटाला आराता ईझूमीने पास फानाली लालरमपूईयाला दिला होता; पण त्याने मारलेला फटका किंचित गोल पोस्टजवळून गेल्याने पुणो एफसीची आणखी एक संधी हुकली. अखेर मध्यांतरार्पयत साळगावकरचा संघ एका गोलने आघाडीवर राहिला.
अंतिम सामन्यास लेफ्टनंट जनरल फिलीप केंपोसे व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित होते. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय लष्कराचे बॅँड पथक आणि जवानांनी साहसी सादरीकरण केले. 
या वेळी उपस्थितांना पॅराशूट ग्लायडिंगचा थरारही अनुभवता आला.  
(क्रीडा प्रतिनिधी)
 
च्दुस:या सत्रत पुणो एफसीने आक्रमक सुरुवात केली. तर दुसरीकडून साळगावकरने बचावफळीवर भर दिला. चोख बंदोबस्त ठेवत त्यांनी पुणो एफसीला संधी दिली नाही. 
च्असे खेळाच्या 71व्या मिनिटार्पयत चालले होते. त्यानंतर गोव्याच्या संघाला आणखी एक संधी मिळाली होती. मात्र, डॅरल डफीने दिलेल्या पासचे रूपांतर गोलमध्ये करण्यात साळगावकरच्या खेळाडूला यश आले नाही. 
च्खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी 
असताना पुणो संघाने जोरदार आक्रमण केले. मात्र, त्यांना यश आले नाही. बदली खेळाडू एरीक ब्राउन याने मारलेला फटका दिशाहीन ठरला.

 

Web Title: Salgaocar is champion of 'Durand'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.