शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:47 IST

Sakshi Malik : उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे.

नवी दिल्ली : कुस्तीचे भवितव्य वाचवा, असे आवाहन महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना केले आहे. यासंदर्भात साक्षी मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात साक्षी मलिकने भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. साक्षी मलिकने व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संबोधित करताना म्हटले आहे की, कुस्ती फेडरेशनच्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ब्रिजभूषण यांचा 'मूर्खपणा' आणि दबदबा तुम्ही आणि संपूर्ण जगाने पाहिला. ज्यामुळे मला अत्यंत अस्वस्थ मनाने कुस्ती सोडावी लागली. पण यामुळे फारसा फरक पडला नाही. 

काही दिवसांनी फेडरेशनने पुन्हा आपले काम सुरू केले. मात्र, या मुद्द्यावर उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे. पुढे साक्षी मलिक म्हणाली, "मी या उत्तर रेल्वेमध्ये मुलांची भरती पाहत आहे. अशा स्थितीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून सातत्याने धमक्या येत आहेत की, मला या भरतींमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवले जाईल. मला अशा धमक्यांची फारशी पर्वा नाही, पण कुस्तीचे भवितव्य अशा लोकांच्या हातात आहे,जे ते खराब करत आहेत, याचे वाईट वाटत आहे. माझी तुम्हाला (पीएम मोदी) विनंती आहे की आमची कुस्ती वाचवा."

याचबरोबर कुस्ती फेडरेशन रद्द झाल्यानंतरही काम करत असल्याबद्दल साक्षी मलिक म्हणाली की, सरकारने रद्द केलेल्या फेडरेशनला हायकोर्टाने फटकारले होते आणि काम सुरू ठेवण्यासाठी त्यांचे उपक्रम थांबवले होते, परंतु तरीही त्यांचे काम थांबलेले नाही. हायकोर्टाने जेव्हा पुन्हा हस्तक्षेप केला. तेव्हा त्यांनी मुलांना पुढे केले.साक्षी मलिक म्हणाली, "मी त्या मुलांची मजबुरी समजू शकते, त्यांचे संपूर्ण करिअर त्यांच्या पुढे आहे. आणि हे करिअर अशा फेडरेशनच्या हातात  आहे. सर, माझी तुम्हाला विनंती आहे की, जर तुम्हाला ब्रिजभूषण यांचे वर्चस्व असलेल्या फेडरेशनमध्ये मुलींचे भविष्य सुरक्षित आहे, असे वाटत असेल तर तुम्ही फेडरेशनवरील स्थगिती उठवावी आणि जर तुम्हाला वाटत नसेल तर कायमस्वरूपी उपायाचा विचार करावा."

टॅग्स :Wrestlingकुस्तीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी