साकेत, रामकुमार यांचे रँकिंग वधारले
By Admin | Updated: October 21, 2014 02:53 IST2014-10-21T02:53:41+5:302014-10-21T02:53:41+5:30
इंदूर ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी टेनिस रँकिंगमध्ये साकेत ४५१ क्रमांकावर होता; मात्र त्याने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यामुळे ८० रँकिंग गुणांची कमाई केली.

साकेत, रामकुमार यांचे रँकिंग वधारले
नवी दिल्ली : आपला पहिला चॅलेंजर किताब जिंकणारा भारतीय टेनिसपटू साकेत मायनेनी आणि इंदूर ओपनच्या उपांत्य फेरीत मजल मारणारा रामकुमार रामनाथन यांना ताज्या एटीपी रँकिंगमध्ये लाभ झाला आहे़ महिला दुहेरीत सानिया सहाव्या आणि दुहेरीत रोहन बोपन्ना २८व्या स्थानावर विराजमान आहे़
इंदूर ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी टेनिस रँकिंगमध्ये साकेत ४५१ क्रमांकावर होता; मात्र त्याने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यामुळे ८० रँकिंग गुणांची कमाई केली. त्याने आता २८३व्या स्थानावर उडी घेतली आहे़ १९ वर्षीय रामकुमार २२६व्या स्थानावर पोहोचला आहे़ सध्या सोमदेव देववर्मन भारताचा सर्वोच्च रँकिंग मिळविणारा खेळाडू आहे़ (वृत्तसंस्था)