शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लिम्बाराम यांच्या उपचारासाठी क्रीडामंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 2:03 AM

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपचारात अडथळे येत असल्याने लक्ष घालण्याची विनंती तिरंदाजी महासंघांने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचण्याकडे शनिवारी केली.

कोलकाता : आॅलिम्पिकमध्ये तीनवेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनुभवी तिरंदाज आणि प्रशिक्षक लिम्बाराम यांच्यावर नवी दिल्लीत उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपचारात अडथळे येत असल्याने लक्ष घालण्याची विनंती तिरंदाजी महासंघांने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचण्याकडे शनिवारी केली.भारतीय तिरंदाजी महासंघाचे महासचिव प्रमोद चांदूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ४७ वर्षांचे लिम्बाराम यांच्या पायावर सूज आली आहे. पत्नी मेरियन जेनीसोबत लिम्बाराम वर्षभरापासून जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना नियमित इनजेक्शन देणारा वैद्यकीय सहाय्यक लॉकडाऊनमुळे येत नसल्याने इंजेक्शन देण्यात अडचण येत आहे. शिवाय लिम्बाराम यांना एम्समध्ये तपासणीसाठी जाणे कठीण होऊन बसले आहे. चांदूरकर यांनी लिम्बाराम यांच्या प्रकृतीची माहिती महासंघाचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांना दिली. आमचे पदाधिकारी पतीपत्नीच्या संपर्कात असून योग्य व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय मुंडा यांनी क्रीडामंत्र्यांना विनंती केली. लवकरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचे आश्वासनदेखील मिळाले असल्याची माहिती चांदूरकर यांनी दिली.बार्सिलोना आॅलिम्पिक १९९२ मध्ये कांस्यपदक जिंकणारे लिम्बाराम यांना आर्थिक चणचणीमुळे एम्स आणि जीबी पंत इस्पितळात नियमित उपचार घेता येत नाही. मंत्रालयाने त्यांच्या उपचाराची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोच या नात्याने लिम्बाराम यांनी २०१० च्या राष्टÑकुल स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकून दिली होती. त्यांच्या कार्यकाळात भारताचा रिकर्व्ह तिरंदाजी संघ नंबर वन बनला. लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताच्या अपयशी कामगिरीमुळे लिम्बाराम यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते. (वृत्तसंस्था)