सायनाचे मिशन इंडोनेशिया ओपन
By Admin | Updated: June 3, 2015 00:32 IST2015-06-03T00:32:37+5:302015-06-03T00:32:37+5:30
आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीारिजमधील निराशाजनक कामगिरी विसरुन भारताची फुलराणी सायना नेहवाल इंडोनेशिया ओपन टेनिस स्पधेर्साठी सज्ज झाली आहे

सायनाचे मिशन इंडोनेशिया ओपन
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीारिजमधील निराशाजनक कामगिरी विसरुन भारताची फुलराणी सायना नेहवाल इंडोनेशिया ओपन टेनिस स्पधेर्साठी सज्ज झाली आहे. उद्यापासून ती आपल्या अभियानास प्रारंभ करेल.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायनाला या स्पर्धेतही द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेतही सायनाच्या मार्गात तृतीय मानांकित वॅरोलिना मरीन, पाचवे मानांकन मिळालेली शिजियान वांग व अव्वल मानांकित चीनची ज्यूरूई ली यांचा अडथळा असेल. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदकाची मानकरी ठरलेली भारताची पी. व्ही. सिंधूनही नव्या जोमाने स्पर्धेत उतरेल. आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला दुसऱ्याच फेरीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. इंडोनेशिया ओपनमध्ये सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू दुसऱ्याच फेरीत आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.
पुरुष एकेरीत गतवर्षी आपल्या चमकदार खेळाने बॅडमिंटन विश्वाला अचंबित करणाऱ्या कदाम्बी श्रीकांतकडून यावेळीही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला स्पर्धेत चतुर्थ मानांकन मिळाले आहे. सध्या फॉर्ममध्ये नसला, तरी धक्कादायक निकाल नोंदविण्यात श्रीकांत निष्णात आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पोन्नपा या अनुभवी जोडीवर भारताची मदार असेल. सायना नेहवालने २००९, २०१० व २०१२ इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकाविलेले आहे. भूतकाळातील सोनेरी आठवणींच्या बळावर सायना या स्पर्धेत आॅस्ट्रेलिया ओपनपेक्षा सुपर कामगिरी करण्याची क्षमता बाळगून आहे.