सायनाचे लक्ष्य नंबर वन बनण्याचे
By Admin | Updated: December 25, 2014 01:48 IST2014-12-25T01:48:33+5:302014-12-25T01:48:33+5:30
२०१४ मधील कामगिरीवर समाधानी आहे़ आता नवीन वर्षात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य आहे,

सायनाचे लक्ष्य नंबर वन बनण्याचे
नवी दिल्ली : २०१४ मधील कामगिरीवर समाधानी आहे़ आता नवीन वर्षात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य आहे, तसेच या वर्षात जास्तीत जास्त पदके मिळविण्यासाठी विशेष मेहनत घेईन, असे मत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने व्यक्त केले आहे़
सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली सायना म्हणाली, वर्षाच्या सुरुवातीला जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर होते; मात्र आता वर्षअखेर मी चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे़ हे माझे मोठे यश आहे; मात्र हे यश सहजासहजी मिळालेले नाही़ यासाठी मी कसून मेहनत घेतली होती़, असेही तिने म्हटले आहे़
सायनाने सांगितले की, या वर्षात दुखापत आणि फिटनेसचीही समस्या निर्माण झाली होती़ फिटनेस कायम राखण्यासाठी मी कठीण परिश्रम घेतले आहे. (वृत्तसंस्था)