सायनाचा पहिला मुकाबला लिमविरुद्ध

By Admin | Updated: January 20, 2015 23:58 IST2015-01-20T23:58:00+5:302015-01-20T23:58:00+5:30

सव्वालाख डॉलर्स इनामी रक्कमेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालाचा पहिला मुकाबला मलेशियाच्या यिन फुन लिम याच्यासोबत बुधवारी होणार आहे.

Saina's first match against Lim | सायनाचा पहिला मुकाबला लिमविरुद्ध

सायनाचा पहिला मुकाबला लिमविरुद्ध

लखनौ : सव्वालाख डॉलर्स इनामी रक्कमेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालाचा पहिला मुकाबला मलेशियाच्या यिन फुन लिम याच्यासोबत बुधवारी होणार आहे. सायनाला आपला मुकुट वाचविण्यासाठी वर्ल्ड चॅम्प स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याकडून जबरदस्त टक्कर मिळण्याची शक्यता आहे. मारिचा पहिला सामना भारताच्या रुत्विका शिवानी हिच्याशी होणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील कांस्यपदक विजेती पी व्ही सिंधुच्या पुढे भारताच्याच एकता कालिया हिच्याशी होणार आहे.
पुरुष गटात भारताच्या के श्रीकांतला आपल्याच देशाच्या श्रेयांश जैस्वालशी पहिली लढत द्यावी लागेल तर, पारुपाली कश्यपला शुभंकर डे याच्याशी झुंजावे लागेल.
स्पर्धेतील विजेत्याला ९ हजार डॉलर्सची रक्कम मिळणार आहे. उपविजेत्याला ४५६0 डॉलर्स मिळतील.(वृत्तसंस्था)

Web Title: Saina's first match against Lim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.