सायनाला फायनलचे तिकीट
By Admin | Updated: November 16, 2014 01:23 IST2014-11-16T01:23:27+5:302014-11-16T01:23:27+5:30
भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना महिला एकेरीच्या फायनलमध्ये मजल मारली़

सायनाला फायनलचे तिकीट
फुझू : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना महिला एकेरीच्या फायनलमध्ये मजल मारली़ पुरुष गटात भारताच्या क़े श्रीकांत याने प्रतिस्पर्धी खेळाडूला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला़
स्पर्धेत सहावे मानांकन प्राप्त सायना हिने उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या गैरमानांकित लियू शिन हिचा 47 मिनिटांर्पयत रंगलेल्या लढतीत 21-17, 21-17 असा फडशा पाडला आणि थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला़ पुरुष गटातील एकेरीच्या सेमीफायनलमध्ये श्रीकांतने जर्मनीच्या मार्क ज्वेबलर याच्या विरुद्ध 24 मिनिटांर्पयत 21-11, 13-7 अशी आघाडी मिळविली होती़ यानंतर ज्वेबलर हा रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे श्रीकांतला सहज फायनल गाठता आली़ सायनाला आता अंतिम फेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागूची हिच्याशी झुंज द्यावी लागणार आह़े यामागूची हिने उपांत्य फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकन प्राप्त कोरियाच्या बाई ईयोन जू हिचा 47 मिनिटांच्या सामन्यात 21-1क् आणि 25-23 असा पराभव करीत फायनल गाठले आह़े
दरम्यान, जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेली सायना आणि 35व्या क्रमांकावर असलेली जपानची यामागूची यांच्यात यापूर्वी एकही सामना झालेला नाही़ या लढतीत सायनाची बाजू वरचढ मानले जात आह़े मात्र, असे असले, तरी उपांत्य फेरीत यामागूचीने 5व्या मानांकन प्राप्त कोरियन खेळाडूला धूळ चारली आह़े त्यामुळे तिलाही जेतेपदाचे दावेदार मानले जात आह़े
पुरुष गटात श्रीकांतचा सामना चीनच्या लिन डान याच्याशी होणार आह़े लिन डान याने उपांत्य फेरीत चिनी तैपेईच्या चोऊ तिएन चेनला 21-17, 21-17 अशा फरकाने पराभूत करताना फायनलमध्ये प्रवेश
केला़ (वृत्तसंस्था)