सायना अव्वल, ज्वाला-अश्विनीची पीछेहाट
By Admin | Updated: October 9, 2015 04:40 IST2015-10-09T04:40:07+5:302015-10-09T04:40:07+5:30
भारताची स्टार शटलर सायना नेहवाल गुरुवारी जाहीर झालेल्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे; परंतु महिला दुहेरीतील तज्ज्ञ जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी

सायना अव्वल, ज्वाला-अश्विनीची पीछेहाट
नवी दिल्ली : भारताची स्टार शटलर सायना नेहवाल गुरुवारी जाहीर झालेल्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे; परंतु महिला दुहेरीतील तज्ज्ञ जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांची एका स्थानाने घसरण झाली असून, त्या १२व्या स्थानावर आहेत.
जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये सायना सर्वाधिक ८२,७९२ रेटिंग गुणांसह जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू बनली आहे. स्पेनची कॅरोलिना मॉरिस दुसऱ्या स्थानावर, तर कोरियाची सून जी हुयेनने ४ क्रमांकांनी झेप घेतली असून ती तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. दोन वेळेसची विश्व कांस्यपदकविजेती भारताची पी. व्ही. सिंधू तिच्या १३व्या स्थानी कायम आहे.
तथापि, महिला दुहेरीत भारताची अव्वल जोडी ज्वाला आणि अश्विनी एका स्थानाने घसरली असून, १२व्या क्रमांकावर पोहोचली आहे. सूर न गवसू शकणाऱ्या भारतीय जोडीला आॅगस्टमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता, तसेच जपान ओपनमध्येही त्यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. (वृत्तसंस्था)