सायना, श्रीकांत विजयी
By Admin | Updated: May 28, 2015 01:38 IST2015-05-28T01:38:31+5:302015-05-28T01:38:31+5:30
भारतीय स्टार सायना नेहवाल आणि चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी आपापल्या लढती जिंकून आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.

सायना, श्रीकांत विजयी
सिडनी : जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू भारतीय स्टार सायना नेहवाल आणि चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी आपापल्या लढती जिंकून आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे पी.व्ही. सिंधू तसेच पी. कश्यप यांना मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले.
सायनाने मलेशियाची चीह लिडिया यू हिच्यावर ३२ मिनिटांत २१-१२, २१-१० ने विजय साजरा केला. श्रीकांतने डेन्मार्कचा हेन्स ख्रिस्तियन व्हिटिनगस याला ५३ मिनिटांत १४-२१, २१-६, २२-२० ने पराभूत केले. महिला दुहेरीत ज्वाला- अश्विनी यांनी हॉलंडची जोडी सामंथा बर्निंग- ईस टेबलिंग यांच्यावर २१-१३, २१-१३ ने २९ मिनिटांत विजय नोंदविला. एक तास १२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूला २१-१८, १५-२१, २३-२५ अशा फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले. कश्यपसाठीदेखील लढत सोपी नव्हती. आरएमव्ही गुरुसाईदत्तला पहिल्याच फेरीत चीनचा टॉप सिड चेन लोंग याने हाव्हान होते. पहिला सेट गमविल्यानंतर लोंगने १५-२१, २१-९, २१-१७ ने विजय खेचून नेला. मिश्र दुहेरीत भारतीय जोडी प्रणव चोप्रा- अश्विनी पोनप्पा यांचा पहिल्याच फेरीत कोरियाची जोडी चोई सोलगिन- इयोम यांनी ३५ मिनिटांत २१-१९, २१-१४ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)