ट्रोल करणा-या 'त्या' चाहत्याला सायनाने केले 'स्मॅश'...

By Admin | Updated: August 19, 2016 12:55 IST2016-08-19T12:40:14+5:302016-08-19T12:55:24+5:30

पी.व्ही.सिंधूला मिळालेल्या विजयानंतर एका व्यक्तीने सायना नेहवालला घरी जाण्याचा नतद्रष्ट सल्ला देत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Saina smashes her 'troll' fan | ट्रोल करणा-या 'त्या' चाहत्याला सायनाने केले 'स्मॅश'...

ट्रोल करणा-या 'त्या' चाहत्याला सायनाने केले 'स्मॅश'...

>
आणि त्या चाहत्याला सायनाने केले 'स्मॅश'
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधून रिओ ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्याने सर्व भारतीयांच्या उत्साहाला उधाण आले असून सर्वजण तिच्याकडून आता 'सुवर्ण' पदकाची अपेक्षा करत आहेत. आज संध्याकाळी सुवर्णपदकासाठी सिंधूची लढत स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे. सिंधूच्या या कामगिरीमुळे तमाम भारतीय नागरिक आनंद साजरा करत असतानाच एकाने मात्र या आनंदावर विरजण टाकण्याचा प्रयत्न करत भारताची 'फुलराणी' सायना नेहवालला यामध्ये खेचून रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला.
सायना नेहवालला दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये लवकर गाशा गुंडाळावा लागला आणि त्याचाच संदर्भ देत एका व्यक्तीने ट्विटरद्वारे सायनाला बॅग भरून घरी जाण्याचा नतद्रष्ट सल्ला दिला.  मात्र सायनाने खिलाडूवृत्ती दाखवत त्या चाहत्याला शांतपणे फटकारले. 

Web Title: Saina smashes her 'troll' fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.