सायना, सिंधू भिडणार

By Admin | Updated: March 31, 2017 03:44 IST2017-03-31T03:44:19+5:302017-03-31T03:44:19+5:30

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करताना इंडिया ओपन

Saina, Sindhu will fight | सायना, सिंधू भिडणार

सायना, सिंधू भिडणार

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करताना इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, आता हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरुध्द खेळणार असल्याने बॅडमिंटनप्रेमींमध्ये या ‘हायव्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१४, २१-१२ असा धुव्वा उडवला. तसेच, सिंधूने पुन्हा जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान २१-१६, २३-२१ असे परतावले. पुरुषांमध्ये समीर वर्माने उपांत्यपुर्व फेरीत गाठताना हाँगकाँगच्या हू युनविरुद्ध २१-१७, २१-१५ अशी बाजी मारली.

Web Title: Saina, Sindhu will fight