सायना, सिंधू, कश्यप यांची विजयी सलामी
By Admin | Updated: October 16, 2014 01:46 IST2014-10-16T01:46:28+5:302014-10-16T01:46:28+5:30
पराभव करून डेर्न्माक ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आपले विजय अभियान सुरू करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सायना, सिंधू, कश्यप यांची विजयी सलामी
ओडेंसे : भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून डेर्न्माक ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आपले विजय अभियान सुरू करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या पारुपल्ली कश्यमने इंग्लंडच्या राजीव ओसेफचा पराभव केला.
ओडेंसे स्पोटर््स पार्क येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या सायनाला पहिल्या गेममध्ये सूर गवसला नाही. जर्मनीच्या करीन शनासेकडून पहिली गेम १२-२१ गुणांनी गमाविल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून, अनुक्रमे २१-१०, २१-१२ असा ४९ मिनिटांत विजय नोंदविला.
दुसरीकडे महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने हॉँगकॉँगच्या पुई यिन यिपचा सरळ दोन सेटमध्ये २१-१३, २२-२० असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये हॉँगकॉँगच्या यिन यिनने सिंधूला चांगली झुंज दिली. पण, चांगल्या बहारात असलेल्या सिंधूने आत्मविश्वासाने खेळ करीत सामना जिंकला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या पारुपल्ली कश्यपने इंग्लंडच्या राजीव ओसेफला २१-१५, २१-१८ गुणांनी नमविले. मिश्र दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तिचा रशियचा जोडीदार ब्लादिमिर इव्हानोव्हला युन लुंग चान आणि यिंग सुएत सीकडून १८-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)