सायना उपांत्य फेरीत

By Admin | Updated: August 15, 2015 02:03 IST2015-08-15T02:03:09+5:302015-08-15T02:03:09+5:30

भारतीय स्टार सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दोन वेळेची कांस्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व

Saina in semifinals | सायना उपांत्य फेरीत

सायना उपांत्य फेरीत

जकार्ता : भारतीय स्टार सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दोन वेळेची कांस्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत महिला एकेरीत शुक्रवारी सनसननाटी पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याआधी ज्वाला-गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना देखील महिला दुहेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.
गुरुवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली चीनची ली जुईरुई हिला नमविणारी ११ वी मानांकित सिंधूला आज आठवी मानांकित कोरियाची सूंग जी हूएन हिने एक तास २२ मिनिटांत कडव्या संघर्षानंतर २१-१७, १९-२१, २१-१६ ने पाराभूत केले. २०१३ आणि २०१४ मध्ये सलग दोनदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य विजेती सिंधूचा सूंगविरुद्धचा विक्रम ३-१ असा होता. या सामन्यात मात्र प्रतिस्पिर्धी खेळाडू सिंधूवर हावी झाली. सिंधूने सामन्यात ५४ पैकी तीन गेम गुण जिंकले. पहिला गेम १७-२१ ने गमविल्यानंतर सिंधूने मुसंडी मारली होती.
त्याआधी भारताची १३ वी मानांकित दुहेरी जोडी ज्वाला-अश्विनी यांचा जपानच्या नाकोओ फुकमॅन आणि कुरुमी योनाओ या बिगर मानांकित जोडीने ४६ मिनिटात सलग गेममध्ये २५-२३, २१-१४ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)


शुक्रवारी रंगलेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दुसरी मानांकित सायनाने सहावी मानांकित २०११ ची सुवर्ण विजेती व जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू चीनची वांग यीहान हिच्यावर २१-१५, १९-२१, २१-१९ अशा फरकाने विजय साजरा केला. आॅलिम्पिक कांस्य विजेती सायनाने विश्व स्पर्धेत सहाव्या प्रयत्नात प्रथमच उपांत्य फेरीत धडक दिल्यामुळे एक पदकही निश्चित झाले आहे. सायनाला शनिवारी उपांत्य फेरीत बिगर मानांकित खेळाडू इंडोनेशियाची लिंडावेनी फानेत्री हिचे आव्हान राहील. सायनाचा लिंडावेनीविरुद्धचा विजयाचा रेकॉर्ड २-१ असा आहे. सायनाचे विश्व चॅम्पियनशिपमधील हे पहिले पदक असेल. सिंधूनंतर विश्व स्पर्धेत पदक एकेरीत पदक जिंकणारी सायना दुसरी महिला खेळाडू ठरेल.

Web Title: Saina in semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.