सायनाची माघार

By Admin | Updated: November 18, 2015 01:41 IST2015-11-18T01:41:31+5:302015-11-18T01:41:31+5:30

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या दुखापतीचे ग्रहण सुटताना दिसत नसून बुधवारपासून सुरु होणाऱ्या हाँगकाँग ओपनमधून तिने माघार घेतली आहे. तिच्या अनुपस्थित

Saina retraces | सायनाची माघार

सायनाची माघार

कोलून (हाँगकाँग) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या दुखापतीचे ग्रहण सुटताना दिसत नसून बुधवारपासून सुरु होणाऱ्या हाँगकाँग ओपनमधून तिने माघार घेतली आहे. तिच्या अनुपस्थित पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत या साडेतीन लाख डॉलर्स इनामी रक्कमेच्या स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व करतील.
गेल्या आठवड्यात चीन सुपर सेरिजची उपविजेती ठरलेली सायना त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच दुखापतग्रस्त असलेली जाणवली. चीनच्या ली शुएरुईविरुध्द खेळताना तिला त्रास होत होता. त्यामुळे तिने सत्रातील शेवटची स्पर्धा असलेल्या हाँगकाँग ओपनमधून हटण्याचा निर्णय घेतला. २0१0 साली सायना या स्पर्धेची विजेती होती. भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाला आहे. सिंधूला पहिल्याच फेरीत मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. विश्व चॅम्पियन आणि अव्वल मानांकित खेळाडू स्पेनच्या कॅरोलीन मारीन हिच्याशी तिची सलामी झडणार आहे. सिंधूने गेल्या महिन्यात डेन्मार्क ओपनमध्ये मारिनला हरविले आहे. परंतु मारिनने सिंधूला तीन सामन्यात हरविले आहे. पुरुष विभागात गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये पोहचलेला किदाम्बी श्रीकांत यंदा पहिल्याच सामन्यात चीनच्या टियान होवेई याच्याशी होईल. या टियानने श्रीकांतला यंदा चार वेळा हरविले आहे. तर दुसरीकडे अजय जयरामला पहिल्या सामन्यात अव्वल मानांकित आणि वर्ल्ड चॅम्पियन चेन लौंगशी लढावे लागणार आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा जुंग क्युंग युन - शिन स्युंग चान या कोरियन जोडीविरुध्द अभियान सुरु करतील.

Web Title: Saina retraces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.