सायना, प्रणितची नजर थायलंड ओपनवर
By Admin | Updated: May 30, 2017 01:00 IST2017-05-30T01:00:39+5:302017-05-30T01:00:39+5:30
भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी. साई प्रणित यांचे लक्ष थायलंड ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेवर असणार असून सव्वालाख

सायना, प्रणितची नजर थायलंड ओपनवर
बँकॉक : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी. साई प्रणित यांचे लक्ष थायलंड ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेवर असणार असून सव्वालाख डॉलर्स इनामी रककमेच्या या स्पर्धेला उद्या पात्रता फेरीने सुरुवात होत आहे.
वडील आजारी असल्याने सायना नेहवाल सुदीरमन चषक स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. परंतु वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया मास्टर्स किताब जिंकल्यानंतर आणखी एक ग्रां.प्री. विजेतेपद मिळवण्यास ती सज्ज झाली आहे. द्वितीय मानांकित सायनाची सलामी स्लोव्हाकियाची मार्टिना रेपिस्का हिच्याशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यात सायनाला अडचण येईल, असे वाटत नाही. या स्पर्धेत सायना अंतिम फेरीत पोहोचली तर तिला तेथे माजी वर्ल्ड चॅम्पियन रतनाचानोक इंतानोन हिच्याशी तिची लढत होवू शकते. आपला मायदेशातील जोडीदार के. श्रीकांत याला हरवून सिंगापूर ओपनचा किताब जिंकणाऱ्या बी. साई प्रणीत या स्पर्धेतही विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक आहे. स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात तो इंडोनेशियाच्या नाथानियल अर्नस्टान सुलिस्तयो याच्याविरुद्ध करणार आहे.