सायना नेहवालची मलेशिया ओपनच्या सेमिफायनलमध्ये धडक
By Admin | Updated: April 3, 2015 17:21 IST2015-04-03T17:21:06+5:302015-04-03T17:21:06+5:30
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारताची टेनिसस्टार सानिया नेहवालने मलेशिया ओपनच्या सेमिफायनलमध्ये धडक मारली.

सायना नेहवालची मलेशिया ओपनच्या सेमिफायनलमध्ये धडक
ऑनलाइन लोकमत
क्वालांलपूर, दि. ३ - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारताची टेनिसस्टार सानिया नेहवालने मलेशिया ओपनच्या सेमिफायनलमध्ये धडक मारली.
चीनची आघाडीची खेळाडू सुन यू हिचा २१-११, १८-२१, २१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत सायनाने ही कामगिरी केली. हा सामना जवळपास १० तास एक मिनिट चालला. सेमिफायनलमध्ये सायना हिचा सामना चीनच्या ली जुएरेई हिच्यासोबत होणार आहे. जुएरेई हिने क्वार्टर फायनलमध्ये हमवतन यिहान वांग हिचा १४-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव केला आहे.