सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर
By Admin | Updated: August 20, 2015 15:57 IST2015-08-20T15:57:26+5:302015-08-20T15:57:26+5:30
वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत हरूनही आधीच्या चमकदारीच्या कामगिरीच्या बळावर सायना नेहवालने पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.

सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - रविवारी जकार्तामध्ये वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत हरूनही आधीच्या चमकदारीच्या कामगिरीच्या बळावर सायना नेहवालने पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने गुरुवारी क्रमवारी जाहीर केली. स्पेनची कॅरोलिना मरीन जिने सायनाला वर्ल्ड चँपियनशिमध्ये सायनाला हरवले ती दुस-या स्थानावर आहे तर चीनची ताई त्झू यिंग तिस-या स्थानावर आहे.
वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोचल्यावरच सायना पहिल्या स्थानावर झेप घेईल हे जवळजवळ स्पष्ट झाले होते, ज्यावर आज शिक्कामोर्तब झाले. पी. व्ही. सिंधू १४व्या स्थानावर आहे, तर डबल्सची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा १०व्या स्थानावर आहेत.
पुरूष एकेरीमध्ये के. श्रीकांत चौथ्या स्थानावर असून एच. एस. प्रणॉय १२ व्या स्थानावर आहे.