सायनाची आगेकूच मात्र जागतीक क्रमवारीत घसरण
By Admin | Updated: October 23, 2015 17:35 IST2015-10-23T17:34:40+5:302015-10-23T17:35:56+5:30
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत जपानच्या मिनास्तू मिूतानीचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला.

सायनाची आगेकूच मात्र जागतीक क्रमवारीत घसरण
ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि.२३ - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत जपानच्या मिनास्तू मिूतानीचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. महिला एकेरीमध्ये जपानच्या मिनास्तू मिूतानीचा सायनाने सरळ सेट मध्ये पराभव करत क्वार्टर फाईनल मध्ये धडक मारली आहे. पी कश्यपयाचा इंग्लडच्या राजिव ने २१-११,१३-२१,४-२ असा पराभव केला, त्यामुळे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील त्याचे आव्हान संपले आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला जागतिक क्रमवारीतील नंबर वनचे सिंहासन गुरुवारी गमवावे लागले. या सिंहासनावर स्पेनची अव्वल बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरिन पुन्हा आरूढ झाली. तिने महिला एकेरीत अव्वल स्थान गाठले. जपान ओपन आणि डेन्मार्क ओपनमधील खराब कामगिरीमुळे सायनाच्या क्रमवारीवर परिणाम झाला आहे.