शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल आदर्श, हा विजय सर्वांत मोठा- मालविका बनसोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 08:53 IST

सामन्यानंतर मालविका म्हणाली, ‘मला आतापर्यंत विश्वासच होत नाही की मी सायनाला हरविले आहे.

नवी दिल्ली : सायना नेहवालचा खेळ पाहत मोठी झालेली नागपूरची युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने गुरुवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत  ऑलिम्पिक कांस्य विजेत्या सायना नेहवालवर अवघ्या ३४ मिनिटांत सरळ गेममध्ये २१-१७, २१-१० ने सनसनाटी विजयाची नोंद केली.  हा आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया २० वर्षांच्या मालविकाने विजयानंतर व्यक्त केली.

सामन्यानंतर मालविका म्हणाली, ‘मला आतापर्यंत विश्वासच होत नाही की मी सायनाला हरविले आहे. हा शानदार अनुभव ठरला. मी विजयामुळे फारच आनंदी आहे. सायना माझी आदर्श खेळाडू आहे. सायना एका दशकाहून अधिक काळ भारतीय बॅडमिंटनचे नेतृत्व करीत होती. मी सायनाला खेळताना पाहूनच करिअरची सुरुवात केली.  माझ्या खेळावर खरे तर सायनाचा फारच प्रभाव आहे. सायनाच्या खेळाची शैली मला आवडते. सायनाच्या फटक्यांमध्ये अधिक ताकद असल्यामुळे मला तिचा खेळ आवडतो.’ 

 ‘मी अष्टपैलू खेळ केला. सायनावर विजय मिळविण्याच्या हेतूने काही विशेष करण्याची गरज भासली नाही.  कुठल्याही मोठ्या स्पर्धेत आम्ही दोघी एकमेकींविरुद्ध खेळण्याची ही पहिली वेळ होती. ती माझी आदर्श असल्याने तिच्याविरुद्ध खेळणे स्वप्नपूर्तीसारखे आहे.  हा विजय इंडियन ओपनसारख्या सुपर ५०० स्पर्धेत मिळाला हे विशेष. मी माझ्यासाठी मोठी उपलब्धी ठरावी. कारकिर्दीत सर्वांत मोठा विजयदेखील,’ असेही मालविकाने सांगितले.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल