शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सायना अधिक मजबूत

By admin | Published: August 02, 2015 11:39 PM

सायना नेहवाल सध्या जरी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली नसली तरी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास

बंगलोर : सायना नेहवाल सध्या जरी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली नसली तरी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेत ती इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त कणखर आणि मजबूत आहे, असेही विमल कुमार यांनी सांगितले.माजी राष्ट्रीय प्रशिक्षक असलेले विमल कुमार यांनी सांगितले की, विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगला खेळ पाहण्यास मिळेल. कारण जागतिक पातळीवर दबदबा असलेल्या चिनी खेळाडूंना गेल्या दहा महिन्यांपासून यश मिळालेले नाही. एशियन गेम्सनंतर गेल्या एक वर्षात स्पेनची कॅरोलीना मारिन, चिनी तैपेईची ताई जू यिंग, थायलंडची रतचानोक इंतानोन आणि सायना या चौघींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सर्वच अव्वल खेळाडूंकडून कठीण संघर्षाची अपेक्षा आहे. कारण प्रत्येकीला स्पर्धेची तयारी करण्यासाठी पाच आठवड्यांहून जास्त वेळ मिळाला आहे.स्पर्धेच्या ड्रॉबाबत बोलताना विमल कुमार म्हणाले, सायनाने चांगली तयारी केली आहे; पण तिला कठीण ड्रॉ मिळाला आहे. तिला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तकाहाशी आणि नंतर चीनच्या वांग यिहान हिच्याशी लढावे लागू शकते.विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात सायनाला कधीही यश आलेले नाही. इतकेच नाही तर स्पर्धेची उपांत्यफेरीही गाठण्यात तिला यश आलेले नाही. यंदा मात्र सायना विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून गणली जात आहे.प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये सायंकाळचे सराव सत्र संपवल्यानंतर सायना म्हणाली, ‘विमलसरांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केल्यापासून चांगले यश मिळाले आहे. सध्या दुसरे मानांकन असले तरी मी अव्वल क्रमांकही मिळविला होता. या स्पर्धेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. खांद्यामध्ये अजूनही थोडासा त्रास जाणवत असला तरी लवकरच ठीक होईल, अशी अपेक्षा आहे.’(वृत्तसंस्था)