सह्याद्री, सरस्वतीची घोडदौड
By Admin | Updated: January 30, 2015 03:51 IST2015-01-30T03:51:38+5:302015-01-30T03:51:38+5:30
विभागीय खो खो स्पर्धेत गुरुवारी सह्याद्री, सरस्वती, प्रबोधन व ग्रिफीन संघांनी विजयी घोडदौड कायम राखली. श्री सह्याद्री संघाने युवक क्रीडा

सह्याद्री, सरस्वतीची घोडदौड
मुंबई : विभागीय खो खो स्पर्धेत गुरुवारी सह्याद्री, सरस्वती, प्रबोधन व ग्रिफीन संघांनी विजयी घोडदौड कायम राखली.
श्री सह्याद्री संघाने युवक क्रीडा मंडळावर २२-१६ असा ६ गुणांनी विजय संपादन केला. सिद्धेश कदम, दुर्वेश साळुंखे, संकेत सावंत यांनी सह्याद्रीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सरस्वती स्पो. क्लबने परांजपे स्पो. क्लबचा १५-१३ असा ७ मि. राखून सहज पराभव केला.
इतर लढतींत प्रबोधन क्रीडा भवनने दादरच्या अमर हिंद मंडळाचा २१-१३ असा पराभव केला, तर ग्रिफीन जिमखान्याने विद्यार्थी क्रीडा केंद्रावर १६-१४ असा विजय साजरा केला. (क्रीडा प्रतिनिधी)