सहारा कप, बांग्लादेशची प्रथम फलंदाजी
By Admin | Updated: June 15, 2014 12:43 IST2014-06-15T12:43:17+5:302014-06-15T12:43:46+5:30
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सहारा कप, बांग्लादेशची प्रथम फलंदाजी
ऑनलाइन टीम
मीरपूर, दि. १५ - भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनी व अन्य स्टार खेळाडूंविना बांग्लादेश दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाची मदार नवख्या खेळाडूंवर अवलंबून आहे.
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ बांग्लादेश दौ-यावर गेला आहे. सुरेश रैनाकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली असून या दौ-यात नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे. रॉबिन उथप्पाने या दौ-यातून पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकली. बांग्लादेशचा कर्णधार मुश्फिकर रहीमने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली असून बांग्लादेशने दोन षटकात अवघ्या चार धावाच केल्या आहेत.
भारतातर्फे परवेझ रसूल आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे.
भारतीय संघ
अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना (कर्णधार), अंबाटी रायडू, वृध्दीमन साहा(यष्टीरक्षक), अक्षय पटेल, परवेझ रसूल, अमित मिश्रा, उमेश यादव, मोहीत शर्मा