महाराष्ट्राची सावध सुरुवात

By Admin | Updated: November 18, 2015 02:07 IST2015-11-18T02:07:15+5:302015-11-18T02:07:15+5:30

बंगाल संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ५२८ धावांच्या हिमालयापुढे यजमान महाराष्ट्राने राहुल त्रिपाठीच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २९६ अशी मजल मारली.

The sad start of Maharashtra | महाराष्ट्राची सावध सुरुवात

महाराष्ट्राची सावध सुरुवात

पुणे : बंगाल संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ५२८ धावांच्या हिमालयापुढे यजमान महाराष्ट्राने राहुल त्रिपाठीच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २९६ अशी मजल मारली. महाराष्ट्र संघ अजूनही बंगालहून २३२ धावांनी पिछाडीवर आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बंगालने तिसऱ्या दिवशी ८ बाद ५२८ धावांवरच आपला डाव घोषित केला. सुदीप चॅटर्जीचे जबरदस्त शतक आणि अभिमन्यू ईश्वरन, सयान मोंडल, श्रीवत्स गोस्वामी, पंकज शॉ आणि आमीर गानी यांनी झळकावलेले अर्धशतक या जोरावर बंगालने महाराष्ट्रासमोर मोठी धावसंख्या उभारली.
यानंतर महाराष्ट्राची सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर हर्षद खाडिवले (५) याला स्वस्तात बाद करून अशोक दिंडाने महाराष्ट्राला ११ धावांवर पहिला धक्का दिला. स्वप्निल गुगळे (३५) व संग्राम अतीतकर यांनी ५६ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. मात्र मुकेश कुमारने गुगळेला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर त्रिपाठीने अतीतकरसह ९० धावांची भागीदारी केली. अतीततकर ११८ चेंडंूत ६ चौकारांसह ६९ धावा काढून बाद झाला. अंकित बावनेने त्रिपाठीसह १३९ धावांची नाबाद भागीदारी केली. त्रिपाठी २२७ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ११६ धावा काढून खेळपट्टीवर टिकून आहे. दुसऱ्या बाजूला बावने ११२ चेंडूंत ५९ धावांवर खेळत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

धावफलक :
बंगाल (पहिला डाव) : अभिमन्यू ईश्वरन झे. त्रिपाठी गो. फल्लाह ६५, सयान मोंडल त्रि. गो. खुराना ५८, सुदीप चॅटर्जी यष्टीचीत मोटवानी गो. खुराना १४७, मनोज तिवारी झे. मोटवानी गो. मुथुस्वामी ३०, श्रीवत्स गोस्वामी झे. व गो. खुराना ५१, पंकज शॉ पायचीत गो. खुराना ५७, आमीर गानी धावबाद (अतीतकर) ५९, वीर प्रताप सिंग त्रि. गो. फल्लाह २८, प्रग्यान ओझा नाबाद १४, अशोक दिंडा नाबाद २. अवांतर - १७. एकूण : १८० षटकांत ८ बाद ५२८ धावा घोषित.
गोलंदाजी : समाद फल्लाह ३७-७-१०२-२; अनुपम संक्लेचा २१-४-६२-०; श्रीकांत मुंढे ३२-६-८०-०; डॉमनिक मुथुस्वामी ३६-११-९८-१; चिराग खुराना ४१-५-१४१-४; संग्राम अतीतकर ८-०-२३-०; स्वप्निल गुगळे ५-१-१७-०.
महाराष्ट्र (पहिला डाव) : स्वप्निल गुगळे पायचीत गो. मुकेश कुमार ३५, हर्षद खाडिवले झे. चॅटर्जी गो. दिंडा ५, संग्राम अतीतकर झे. चॅटर्जी गो. दिंडा ६९, राहुल त्रिपाठी खेळत आहे ११६, अंकित बावने खेळत आहे ५९. अवांतर - १२. एकूण : ९० षटकांत ३ बाद २९६ धावा.
गोलंदाजी : अशोक दिंडा २३-१-७७-२; प्रग्यान ओझा १४-२-५२-०; वीर प्रताप सिंग १६-३-३९-०; मुकेश कुमार १२-३-२८-१; आमीर गानी १३-०-५६-०; मनोज तिवारी २-०-१०-०; सयान मोंडल १०-१-३०-०.

Web Title: The sad start of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.