सचिनचा संघ ‘केरळ ब्लास्टर’
By Admin | Updated: May 28, 2014 04:02 IST2014-05-28T04:02:33+5:302014-05-28T04:02:33+5:30
इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेतील आपल्या कोची संघाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘केरळ ब्लास्टर’ असे नाव दिले आहे.

सचिनचा संघ ‘केरळ ब्लास्टर’
थिरूवनंतपुरम : इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेतील आपल्या कोची संघाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘केरळ ब्लास्टर’ असे नाव दिले आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर सचिनने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर केरळमध्ये २०१५ मध्ये होणार्या राष्टÑीय खेळांचा राजदूत बनण्याची चंडी यांची विनंतीही तेंडुलकरने या वेळी मान्य केली. तत्पूर्वी येथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. सचिनने विरोधी पक्षनेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनाही फुटबॉलच्या प्रसारासाठी मदत करण्याचे आवाहन केले. या वेळी सचिन म्हणाला, ‘केरळवासीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. हे खरेच शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. लोक मला ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणतात. त्यामुळे या नावाशी मला जास्त जवळीक वाटते.’ असे सांगून तो म्हणाला, ‘मी क्रिकेट खेळतच मोठा झालो; मात्र मी अन्य खेळांचाही आनंद घेतो, हे अनेक जणांना माहीत नाही.’ (वृत्तसंस्था)