साराच्या बॉलिवूड प्रवेशाच्या अफवेचे सचिन वैतागला

By Admin | Updated: April 27, 2015 18:45 IST2015-04-27T13:53:37+5:302015-04-27T18:45:46+5:30

सारा तेंडुलकर चित्रपटात काम करणार असल्याच्या बातमीमुळे सचिन वैतागला असून त्याने ट्विटरवरून या वृत्ताचे खंडन केले आहे.

Sachin Wataagala's rumor of Sarah's Bollywood entry rumor | साराच्या बॉलिवूड प्रवेशाच्या अफवेचे सचिन वैतागला

साराच्या बॉलिवूड प्रवेशाच्या अफवेचे सचिन वैतागला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूरसोबत ती लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची बातमी सर्वत्र फिरत होती. सचिनची मुलगी म्हटल्यावर सर्वांनाच तिच्याबद्दल खूप उत्सुकता आहे.. मात्र या सर्व बातम्यांमुळे सचिन खूप वैतागला असून त्याने या वृत्ताचे खंडन केले आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून त्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. 'माझी मुलगी सारा सध्या शिक्षण घेण्यात मग्न आहे. ती चित्रपटात काम करणार असल्याच्या निरर्थक अफवांनी वैतागलो आहे', असे ट्विट सचिनने केले आहे. आता खुद्द सचिननेच या वृत्ताचे खंडन केल्यावर तरी सर्वांना या चर्चेचे उत्तर मिळाले आहे.   
सचिनेने जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हाही त्याला साराच्या बॉलिवूड प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र सचिनने तेव्हा त्या  मुद्यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला होता. आता साराच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्यावर मात्र त्याने या वृत्ताचे खंडन केले आहे.

Web Title: Sachin Wataagala's rumor of Sarah's Bollywood entry rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.