भारतरत्न सचिन तेंडुलकर लिहिणार आत्मकथा

By Admin | Updated: September 2, 2014 17:44 IST2014-09-02T17:31:22+5:302014-09-02T17:44:53+5:30

क्रिकेटमधील देव अर्थात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यातील विविध पैलू आता पुस्तकातून उलगडणार आहे.

Sachin Tendulkar will write autobiography Bharat Ratna | भारतरत्न सचिन तेंडुलकर लिहिणार आत्मकथा

भारतरत्न सचिन तेंडुलकर लिहिणार आत्मकथा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - क्रिकेटमधील देव अर्थात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील विविध पैलू आता पुस्तकातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे खूद्द सचिन तेंडुलकर त्याची आत्मकथा लिहिणार असून ६ नोव्हेंबर रोजी दिमाखदार सोहळ्यात सचिनच्या आत्मकथेचे प्रकाशन होणार आहे. 
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचा विश्वविक्रम रचणारा भारत रत्न सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे.  मुंबईतील मैदानापासून सातत्त्यपूर्ण खेळी करत देशविदेशातील मैदान गाजवणा-या सचिन तेंडुलकरने सातत्त्यपूर्ण खेळी करत क्रिकेटवर स्वतःची छाप पाडली. सचिनचा हा प्रवास आता पुस्तकातून उलगडणार आहे. सचिन 'प्लेईंग इट माय वे' या आत्मकथेतून त्याच्या कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहे. 'या आत्मकथेद्वारे आजपर्यंत कोणालाची माहित नसलेले आयुष्यातील काही प्रसंग सर्वांसमोर मांडणार आहे असे सचिन सांगतो. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच लिखाण करतानाही मला प्रामाणिकपणा दाखवावा लागेल हे सांगायला तो विसरत नाही. माझा तीन दशकांचा प्रवास एका पुस्तकात मांडणे कठीण असले तरी माझ्या चाहत्यांसाठी मी हे आव्हान स्वीकारले असे सचिन नमूद करतो. 
या पुस्तकाचे प्रकाशक होडर अँड स्टेनन हे आहेत. याविषयी माहिती देताना प्रकाश ब्लूम फिल्ड म्हणाले, सचिनची आत्मकथा नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. भारत आणि जगभरात एकाच वेळी या पुस्तकाचे प्रकाशन होईल. 

Web Title: Sachin Tendulkar will write autobiography Bharat Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.