सचिन तेंडुलकरवरील चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा : कोहली

By Admin | Updated: April 26, 2016 05:42 IST2016-04-26T05:42:06+5:302016-04-26T05:42:06+5:30

भारतीय क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ विराट कोहली, त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.

Sachin Tendulkar is waiting for the film: Kohli | सचिन तेंडुलकरवरील चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा : कोहली

सचिन तेंडुलकरवरील चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा : कोहली

मुंबई : भारतीय क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ विराट कोहली, त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. ही बाब विराटने आपल्या चाहत्यांसाठी लाँच करण्यात आलेल्या ‘फॅनबॉक्स’दरम्यान सांगितली.
२७ वर्षीय कोहली म्हणाला, ‘‘माझा बालपणाचा आदर्श कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तो माझा आदर्श असेल, कारण त्याच्यामुळेच मी क्रिकेटमध्ये आलो. मी सचिन तेंडुलकरच्या जीवनावर येणाऱ्या आगामी चित्रपटाची उत्कटतेने प्रतीक्षा करीत आहे. मी नेहमीच त्याचा सन्मान करतो. त्याचा चित्रपट खूपच मनोरंजक असेल.’’
विराटला क्रिकेटर तेंडुलकर, मोहंमद अजहरुद्दीन आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावरील चित्रपटांविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने वरील उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘मी हे तिन्ही चित्रपट पाहू इच्छितो. त्यात महेंद्रसिंह धोनीचा चित्रपट खूप वेगळा असेल आणि त्याचबरोबर अजहरचा चित्रपटदेखील.’’
तथापि, कोहलीने त्याच्या वैयक्तिक जीवनावरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे बॉलिवूड स्टार रिओ आॅलिम्पिकसाठी सद्भावनादूत नियुक्त करण्याच्या निर्णयाविषयीच्या वादावरही त्याने उत्तर देण्याचे टाळले.

Web Title: Sachin Tendulkar is waiting for the film: Kohli