सचिन तेंडुलकर २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू

By Admin | Updated: June 25, 2015 17:26 IST2015-06-25T17:26:38+5:302015-06-25T17:26:38+5:30

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Sachin Tendulkar 21st Century Test Player | सचिन तेंडुलकर २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू

सचिन तेंडुलकर २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू

>ऑनलाइन लोकमत
मेलबॉर्न, दि. २५ - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून सर्वाधिक जास्त मतं मिऴाली आहेत.
या सर्वेक्षणात सर्वोत्तम कसोटी खेऴाडू म्हणून २००० सालापासूनच्या १०० खेळाडूंची यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये सचिन पहिल्या स्थानावर असून त्याच्यापाठोपाठ दुस-या स्थानावर श्रीलंकेचा खेळाडू कुमार संगकारा आणि तिस-या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा खेडाळू अॅडम गिलख्रिस्ट आहे. 
सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा आयकॉन असलेल्या सचिनला २३ टक्के मतं मिळाली आहेत, जवळजवळ १६००० क्रिकेटच्या चाहत्यांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला होता. तर, कुमार संगकाराला १२ टक्के मतं मिळाली आहेत. 
सचिन आणि संगकारा यांच्यापाठोपाठ टॉप टेनमध्ये अनुक्रमे अॅडम गिलख्रिस्ट १३ टक्के, रिकी पॉन्टिंग ११ टक्के, जॅक कॅलिस ११ टक्के, एबी डीविलर्स १० टक्के, शेन वॉर्न ९ टक्के, ग्लेन मॅग्रा ५ टक्के, मुथय्या मुरलीधरन ३ टक्के आणि डेले स्टेनला १ टक्का मत मिऴाले आहे. 

Web Title: Sachin Tendulkar 21st Century Test Player