ब्रिटीश एअरवेजवर सचिन भडकला
By Admin | Updated: November 13, 2015 14:13 IST2015-11-13T14:00:38+5:302015-11-13T14:13:58+5:30
मैदानात शांत व संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर ब्रिटीश एअरवेजच्या सुमार सेवेवर चांगलाच भडकला आहे.

ब्रिटीश एअरवेजवर सचिन भडकला
ऑनलाइन लोकमत
ह्यूस्टन, दि. १३ - मैदानात शांत व संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर ब्रिटीश एअरवेजच्या सुमार सेवेवर चांगलाच भडकला आहे. सचिनने ट्विटवर ब्रिटीश एअरवेजच्या कारभारावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून कुटुंबाचे तिकीट कन्फर्म न झाल्याने सचिन चांगलाच संतापला आहे.
सचिन तेंडुलकर सध्या ऑल स्टार्स क्रिकेट मालिकेसाठी अमेरिकेत असून सामन्यासाठी त्याला लॉस एँजेलिस येथे जायचे होते. सचिनसोबत त्याचे कुटुंबही होते. ब्रिटीश एअरवेजने जागा उपलब्ध असूनही कुटुंबाचे तिकीट कन्फर्म केले नाही असे ट्विट करत सचिनने कंपनीच्या कारभारावर टीका केली. ब्रिटीश एअरवेजने सामान टॅग करुन भलत्याच ठिकाणी पाठवून दिले व याविषयी कंपनीला काहीघेणेही नाही असे त्याने म्हटले आहे. सचिनच्या या ट्विटवर ब्रिटीश एअरवेजने प्रतिक्रिया दिली असली तरी त्यावरुनही ब्रिटीश एअरवेजवर टीकेचा भडीमार होत आहे. 'सचिन तुझे संपूर्ण नाव व बॅगेज नंबर दे आम्ही तुझी मदत करतो' असे ट्विट एअरवेजने केले होते. मात्र कंपनीने सचिनचे पूर्ण नाव विचारुन स्वतःच अज्ञात उघड केल्याची बोचरी टीका सोशल मिडीयावर होत आहे.