सरावात सचिन एकही चेंडू खेळला नव्हता - द्रविड

By Admin | Updated: August 6, 2014 01:30 IST2014-08-06T01:30:21+5:302014-08-06T01:30:21+5:30

सरावादरम्यान सचिनने एकही चेंडू खेळला नव्हता, असा खुलासा त्याचा माजी सहकारी राहुल द्रविडने केला. या विश्वकप स्पर्धेत सचिनने विक्रमी 673 धावा फटकाविल्या होत्या.

Sachin did not play any ball in the innings - Dravid | सरावात सचिन एकही चेंडू खेळला नव्हता - द्रविड

सरावात सचिन एकही चेंडू खेळला नव्हता - द्रविड

नवी दिल्ली : 2003 विश्वकप स्पर्धेत सचिन तेंडुलकर शानदार फॉर्मात होता, पण या स्पर्धेदरम्यान सरावादरम्यान सचिनने एकही चेंडू खेळला नव्हता, असा खुलासा त्याचा माजी सहकारी राहुल द्रविडने केला. या विश्वकप स्पर्धेत सचिनने विक्रमी 673 धावा फटकाविल्या होत्या. 
द्रविड म्हणाला,‘सचिनची तयारी परिस्थितीनुरुप बदलत असते. त्याने 2क्क्3 च्या विश्वकप स्पर्धेत नेट्समध्ये एकही चेंडू खेळला नाही. त्याने केवळ थ्रो डाऊंसवर सराव केला होता. सचिन असा का करीत आहे, याचे आम्हाला सर्वाना आश्चर्य वाटत होते.’ मी त्याला याबाबत छेडले असता त्याने सांगितले की, ‘मला चांगले वाटत आहे. नेट्समध्ये सराव करण्याची माझी इच्छा नाही. मी माङया फलंदाजीबाबत आश्वस्त आहे. जर मला विश्वास वाटत आहेत तर धावा नक्की होतील, असेही सचिन म्हणाला होता.’
द्रविडने सचिनची प्रशंसा करताना त्याच्या काळातील महान क्रिकेटपटू असल्याचे म्हटले. सचिनने भारतीय क्रिकेटचे चित्र बदलले, असेही द्रविड म्हणाला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sachin did not play any ball in the innings - Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.