भारतासमोर रशियाचे आव्हान
By Admin | Updated: October 5, 2016 04:01 IST2016-10-05T04:01:12+5:302016-10-05T04:01:12+5:30
देशातील आघाडीच्या ५ देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक

भारतासमोर रशियाचे आव्हान
पणजी : देशातील आघाडीच्या ५ देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आम्ही रशियाविरुद्ध सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करू, असे भारताचे प्रशिक्षक निकोलए अॅडम यांनी सामन्यापूवी सांगितले. हा सामना बांबोळी येथील मैदानावर होईल. उद्घाटनीय सामना ब्राझील आणि चीन यांच्यात होईल. स्पर्धेतील पाचही संघ आज गोव्यात पोहोचतील.
अॅडम म्हणाले, ‘‘काही खेळाडूंच्या किरकोळ दुखापती सोडल्या, तर संपूर्ण संघ मजबूत आहे. अनिकेत जाधव दुखापतग्रस्त होता तोसुद्धा आता ‘फिट’ आहे. रशिया हा मजबूज संघ आहे. त्यांनी क्वालिफाइंग अभियान ९ गुणांसह पूर्ण केले होते. या संघाचा आम्ही आदर करतो. त्यांच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. यामुळे आम्हाला बारकाव्यांवर नजर ठेवावी लागेल. ही स्पर्धा खेळाडूंच्या अनुभवासाठी महत्त्वाची आहे. खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा केली असून १६ वर्षांखालील एएफसी चषकातही चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, भारतीय संघाला स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नव्हती.
विश्वचषकाची तयारी जोरात : दमित्री
विश्वचषकापूर्वी भारतात १७ वर्षांखालील स्पर्धा खेळण्याची संधी मिळत आहे. हा अनुभव आमच्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. स्पर्धेत दिग्गज संघ आहेत. आम्हीसुद्धा आगामी विश्वचषक नजरेपुढे ठेवून तयारी करीत आहोत. दोन वर्षांपासून हा संघ एकत्र आहे. संघातील खेळाडूंचा चांगला अभ्यास झाला असून, त्यांच्यात ताळमेळही उत्तम आहे. भारताविरुद्ध विजयासाठी आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार, असे रशियाचा प्रशिक्षक दमित्री उलयानोव्ह याने सांगितले. दरम्यान, या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे.