रशियन जलतरणपटूंनी केले बंदीविरुद्ध अपिल
By Admin | Updated: August 1, 2016 05:43 IST2016-08-01T05:43:53+5:302016-08-01T05:43:53+5:30
आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्यावर घालण्यात आलेल्या बंदीविरुद्ध रशियन जलतरणपटू ब्लादिमिर मोरोजोव्ह आणि निकीता लोबीनसेव यांनी क्रीडा लवादाकडे अपिल केले

रशियन जलतरणपटूंनी केले बंदीविरुद्ध अपिल
रियो डी जानेरो : पुढील आठवड्यात होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्यावर घालण्यात आलेल्या बंदीविरुद्ध रशियन जलतरणपटू ब्लादिमिर मोरोजोव्ह आणि निकीता लोबीनसेव यांनी क्रीडा लवादाकडे अपिल केले आहे. लोबिनसेव आणि मोरोजोव्ह हे दोघेही २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ४ बाय ४०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघाचे सदस्य होते. लोबिनसेवने २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये रशियाच्या रौप्यपदक विजेत्या ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघाचा सदस्य होता. परंतु, विश्व डोपिंगप्रतिबंधक संस्था (वाडा)च्या अहवालात या दोघांचे नाव आल्यामुळे त्यांना रियो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या दोघांचे म्हणणे आहे, की त्यांच्यावर डोपिंगच्या आरोपावरून कधीही बंदी घालण्यात आलेली नाही आणि ते दोघे पूर्णपणे प्रामाणिक आहेत.