शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

महाराष्ट्रातील आदिवासी धावपटूंची गोव्यात चमक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 8:47 PM

गोवा रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी 

पणजी : चिखली (वास्को) येथे पार पडलेल्या १० व्या रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेत पालकर (महाराष्ट्र) जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील चार आदिवासी तरुणांनी चमक दाखविली. या चौघांनी १० किमी शर्यतीत ठसा उमटविला. यामध्ये २१ वर्षीय रोहिदास मोरघाने दहा कि.मी.ची शर्यत अवघ्या ३४.५२ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्याचा साथीदार २० वर्षीय दिनेश म्हात्रे याने ३५.०६ मिनिटे वेळ घेत दुसरा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, त्यांची सहकारी, दहावीत शिकणारी योगीता मराळे हिने महिलांच्या दहा किमीच्या शर्यतीत ४५.१५ मिनिटांच्या अवधीत शर्यत पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. तिची सहकारी २० वर्षीय कविता भोईरने ४९.०० मिनिटांत शर्यत पूर्ण करीत चौथा क्रमांक पटकावला. रोहिदास आणि दिनेश, उल्हासनगरमधील एसएसटी महाविद्यालयाचे दोन्ही पदवीधर विद्यार्थी १० किमी रेसमध्ये नियमितपणे मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतात. कविता आणि योगीता आंतरजिल्हा क्रॉस कंट्री रेसमध्ये पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. चौघांनी मुंबईहून मडगावपर्यंत आणि परत जातानाही रेल्वेने प्रवास केला. रोहिदास याच्या म्हणण्यानुसार, त्यांना शर्यत नोंदणी, प्रवास आणि भोजन यासाठी प्रत्येकी ३००० रुपये खर्च झाला असून त्यांनी केलेल्या कर्तृत्वासाठी रोख बक्षिसे मिळाल्यामुळे त्यांचा आर्थिक भार हलका झाला आहे. रोहिदासने प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे १५ हजार रुपये रोख, दिनेश आणि योगीताने दुसरा क्रमांक पटकाविल्यामुळे १२ हजार ५०० रुपये आणि कविताने चौथा क्रमांक पटकाविल्यामुळे ७ हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. रोख बक्षिसे मिळाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि पुढच्या वर्षी पुन्हा जिंकण्यासाठी परत येणार असल्याची प्रतिक्रिया रोहिदास याने दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रgoaगोवा