पुन्हा रंगणार ‘रॉयल’ लढत...

By Admin | Updated: April 29, 2015 01:34 IST2015-04-29T01:34:50+5:302015-04-29T01:34:50+5:30

आयपीएलमध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

'Royal' will be playing again ... | पुन्हा रंगणार ‘रॉयल’ लढत...

पुन्हा रंगणार ‘रॉयल’ लढत...

बेंगळुरू : उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या लढतीत पराभव स्वीकारणारा राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलमध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
उभय संघांदरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्सचा २३ चेंडू ९ गडी राखून पराभव केला होता. राजस्थान संघाला केवळ १३० धावा फटकावता आल्या होत्या. शेन वॉटसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ आता पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक आहे.
आठ सामन्यांत पाच विजय, दोन पराभव व एक रद्द झालेल्या सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स ११ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आठ सामन्यांत ६ गुणांची कमाई करणारा बेंगळुरू संघ चौथ्या स्थानी आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या राजस्थान संघाला त्यानंतर सलग दोन पराभव स्वीकारावे लागले. राजस्थान संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी अजिंक्य रहाणे व आॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे राजस्थानचे फलंदाज शानदार फॉर्मात आहेत. या दोन्ही खेळाडूंकडून संघाला बुधवारी चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. कर्णधार शेन वॉटसन व अष्टपैलू दीपक हुड्डा यांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. ४३ वर्षांच्या लेगस्पिनर प्रवीण तांबेने छाप सोडली आहे. ख्रिस मॉरिस व जेम्स फॉल्कनेर यांच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे.
दुसऱ्या बाजला बेंगळुरू संघाची या स्पर्धेतील कामगिरी संमिश्र ठरली आहे. संघाने तीन सामने जिंकले असून, तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर बेंगळुरूने राजस्थान व दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव करीत स्पर्धेत पुनरागमन केले
आहे. गृहमैदानावर त्यांचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. आतापर्यंत तीन सामन्यांत (सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज) संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. (वृत्तसंस्था)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक, एस. बद्रीनाथ, डॅरेन सॅमी, मिशेल स्टार्क, निक मेडिन्सन, वरुण अ‍ॅरोन, युजवेंद्र चहल, रिली रोसोयू, विजय झोल, योगेश ताकवाले, अबू नेचिम अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, संदीप वॉरियर, मानविंदर बिस्ला, इक्बाल अब्दुल्ला, सीन एबट, अ‍ॅडम मिल्ने, डेव्हिड विसे, जलज सक्सेना, सरफराज खान, शिशिर बवाने.
राजस्थान रॉयल्स शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुळकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनेर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, रजत भाटिया, संजू सॅम्सन, स्टिव्हन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, जुआन थेरोन, बरिंदर सिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू.

Web Title: 'Royal' will be playing again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.