रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य
By Admin | Updated: April 22, 2016 21:35 IST2016-04-22T21:35:20+5:302016-04-22T21:35:20+5:30
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धमाकेदार खेळी करत रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धमाकेदार खेळी करत रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं 20 षटकांत 3 बाद 185 धावा काढल्या आहेत. धोनीचा रायझिंग पुणे सुपरजाएंट आणि कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ 3 लढतीत 1 विजयासह 2 गुणांवर आहेत. पुणे संघानं सलामीच्या आयपीएल लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सलाही पराभवाची धूळ चारली होती. या सामन्यात विराह कोहलीनं नाबाद 2 षटकार आणि 7 चौकार लगावत 80 धावा काढल्या आहे. राहुल 7, वेटसन 1, खान 2, तर ए बी डिव्हिलियर्स 4 षटकार आणि 6 चौकार खेचत 83 धावा काढल्यात. रायझिंग पुणे सुपरजाएंटनं टॉस जिंकत गोलंदाजी स्वीकारली होती.