सात गडी राखत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सात गडी राखत विजयी
By Admin | Updated: May 2, 2015 20:50 IST2015-05-02T20:50:53+5:302015-05-02T20:50:53+5:30
सामन्या दरम्यान अकाली आलेल्या पावसामुळे १० षटकांत सामना आवर्ता घ्यावा लागला. तरीही १० षटकांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने १११ धावा केल्या होत्या.

सात गडी राखत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सात गडी राखत विजयी
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. २ - सामन्या दरम्यान अकाली आलेल्या पावसामुळे १० षटकांत सामना आवर्ता घ्यावा लागला.
तरीही १० षटकांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने १११ धावा केल्या होत्या. १० षटकांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ११५ धावा करत प्रेक्षकांची मने जिंकली. रॉयल चॅलेंजर्सचा सलामी वीर ख्रिस गेल ब्रॅड हॉगच्या चेंडूवर फटकेबाजी करताना २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आपल्या फंलदाजी चे विराट दर्शन घडवेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती परंतू, रसेलच्या गोलंदाजीवर ३४ धावा करत कोहली बाद झाला. पियुष चावलाच्या चेंडूवर ए बी डि व्हिलिअर्स अवघ्या दोन धावा करत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या मंदीप सिंगने मात्र गोलंदाजांना घाम फोडला. फक्त १८ चेंडूत तीन षटकार व चार चौकार लगावत त्याने ४५ धावा करत सामना जिंकून दिला.