हॉकी मैदानामुळे बदलले रैनाचे भाग्य

By Admin | Updated: September 4, 2014 01:41 IST2014-09-04T01:41:55+5:302014-09-04T01:41:55+5:30

इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वाचे लक्ष वेधणा:या सुरैश रैनासाठी हॉकीचे मैदान वरदान ठरले आह़े

Rotten fate of the hockey grounds replaced | हॉकी मैदानामुळे बदलले रैनाचे भाग्य

हॉकी मैदानामुळे बदलले रैनाचे भाग्य

लखनऊ : इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वाचे लक्ष वेधणा:या सुरैश रैनासाठी हॉकीचे मैदान वरदान ठरले आह़े या अनुभवी खेळाडूने लखनऊमधील अॅस्ट्रोटर्फवर शॉर्ट पिच चेंडू खेळण्याचा सराव करून आपली जगजाहीर कमजोरी दूर करण्यात यश मिळविले आह़े 
सुरैश रैनासाठी शॉर्ट पिच चेंडू मोठी कमजोरी मानली जायची़ मात्र, आता हा स्टार खेळाडू कोणत्याही गोलंदाजांचे शॉर्ट पिच चेंडू यशस्वीपणो खेळून काढतो़ हे सर्व काही शक्य झाले आहे, ते अॅस्ट्रोटर्फवर सराव केल्यामुळेच़ 
इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सामन्यात रैनाने दुस:या वन-डे सामन्यात शानदार शतकी खेळी साकारली होती़ या सामन्यात त्याने ग्रीन पिचवर जेम्स अँडरसनसह अन्य गोलंदाजांची गोलंदाजी फोडून काढली होती़ त्याने शॉर्ट पिच चेंडूंवर जबरदस्त पुलचे फटके लगावून सर्वाना आश्चर्यचकित केले होत़े 
रैनाचे प्रशिक्षक दीपक शर्मा म्हणाले, रैनाला शॉर्ट पिच चेंडू खेळता येत नाही, अशी त्याच्यावर टीका व्हायची़ वेगवान गोलंदाज याला शॉर्ट पिच चेंडूवर बाद करायच़े मात्र, आता परिस्थिती बदलली आह़े रैना कोणत्याही गोलंदाजांचा शॉर्ट पिच चेंडू यशस्वीपणो टोलवू शकतो़ 
भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी रैनाने येथील स्पोर्ट्स कॉलेजच्या अॅस्ट्रोटर्फवर सिंथेटिक चेंडूंने उसळी घेणा:या चेंडूंचा सराव केला होता़ याचाच लाभ त्याला इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत झाला आह़े (वृत्तसंस्था)

 

Web Title: Rotten fate of the hockey grounds replaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.