डेहराडूनच्या पर्वतरांगेत माहीची भटकंती

By Admin | Updated: February 6, 2017 19:41 IST2017-02-06T19:41:38+5:302017-02-06T19:41:38+5:30

इंग्लंडविरुद्ध मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू सध्या हॉलिडे एन्जॉय करताना दिसताहेत.

The rooftops of the Dehradun ranges | डेहराडूनच्या पर्वतरांगेत माहीची भटकंती

डेहराडूनच्या पर्वतरांगेत माहीची भटकंती

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - इंग्लंडविरुद्ध मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू सध्या हॉलिडे एन्जॉय करताना दिसताहेत. त्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे. एकीकडे कर्णधार विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सरावात मग्न आहे, तर दुसरीकडे माहीने डेहराडूनची सफर केली, ही सफरही खास निमित्ताने होती.

धोनीची मुलगी झिवा हिचा वाढदिवस त्याच्या मित्रांना एकत्र आणणारा ठरला. उत्तराखंडच्या पर्वतरांगेत धोनी आणि त्याच्या खास मित्रांनी झिवाचा वाढदिवस साजरा केला. डेहराडूनपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या लांदोर येथे काही मित्रांसोबत काढलेल्या फोटोमुळे धोनीचा हा गुप्त दौरा उघड झाला. मित्रांच्या या ग्रुपमध्ये धोनीची पत्नी साक्षीसुद्धा दिसत आहे. पूर्णा पटेल या मैत्रिणीने धोनी आणि साक्षीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

दरम्यान २०१५ मध्ये जन्मलेली झिवा आता दोन वर्षांची झाली आहे. पूर्णा पटेलने ही संधी साधत धोनीला देहरादूनला आमंत्रित केले. झिवासोबत घालवलेला वेळ आम्हा सगळ्यांसाठी आंनद देणारा ठरला, असे पूर्णा पटेलने पोस्ट केले आहे.

Web Title: The rooftops of the Dehradun ranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.